प्रकाश जावडेकर : कॅप्टन अमरिंदर प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी गप्प का? | पुढारी

प्रकाश जावडेकर : कॅप्टन अमरिंदर प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी गप्प का?

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंजाब काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नवज्योत सिंह सिद्धूवर लावलेल्या आरोपानंतर भाजपने या वादात उडी घेतली आहे.

कॅप्टन अमरिंदर यांनी सिद्धूवर लावलेले आरोप गंभीर आहेत, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी व्यक्त केले.या मुद्यावर काँग्रेसला घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचे चित्र त्यामुळे दिसून येत आहे.

जावडेकर म्हणाले की, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सिद्धू यांच्यावर बरेच गंभीर आरोप लावले आहेत. पाकिस्तानला जावून सिद्धूंनी बाजवा यांची गळा भेट घेतली आहे.

याचा दाखला देत कॅप्टने यांनी सिद्धू यांना देशद्रोही म्हंटले.असे असताना कॅप्टनकडून करण्यात आलेल्या आरोपांवर सोनिया गांधी, राहुन गांधी गप्प का आहेत?, काँग्रेस पक्ष यासंबंधी काही कारवाई करणार आहे का? असे सवाल जावडेकर यांनी उपस्थित केले.

कॅप्टन अमरिंदर यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसला घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापेक्षा कॅप्टन अमरिंदर जास्त प्रसिद्ध झाले होते, यामुळेच त्यांना हटवण्यात आल्याचा टोला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लगावला होता.

आता भाजपकडून उपस्थित करण्यात आलेले प्रश्न आणि आरोपांवर कॉंग्रेसकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button