न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या सर्वोच्च न्यायालयातील बढतीला केंद्राचा हिरवा कंदील | पुढारी

न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या सर्वोच्च न्यायालयातील बढतीला केंद्राचा हिरवा कंदील

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या सर्वोच्च न्यायालयातील बढतीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. दत्ता यांच्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीला केंद्राने मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी सोशल मीडियाद्वारे दिली.

दत्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतल्यानंतर या न्यायालयातील न्यायमूर्तींची एकूण संख्या 28 वर जाईल. सर्वोच्च न्यायालयातील मंजूर न्यायमूर्तींची संख्या 34 इतकी आहे. 9 फेब्रुवारी 1965 रोजी जन्मलेल्या दत्ता यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करण्यासाठी 8 फेब्रुवारी 2030 पर्यंतचा कालावधी मिळणार आहे.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचे सेवानिवृत्तीचे 65 वर्षे इतके आहे. न्यायमूर्ती दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस तत्कालीन सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील कॉलिजियमने गेल्या सप्टेंबर महिन्यात केली होती.

हेही वाचा :

Back to top button