वडिलांसमोरच डॉक्टर तरुणीला नेले पळवून | पुढारी

वडिलांसमोरच डॉक्टर तरुणीला नेले पळवून

हैदराबाद : तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील आदिबाटला भागात शुक्रवारी एका 24 वर्षीय महिला डॉक्टरचे अपहरण करण्यात आले. डझनभर लोकांनी त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली. त्यानंतर वडिलांना मारहाण करून त्यांनी मुलीला जबरदस्तीने पळवून नेले. मात्र, पोलिसांनी काही तासांतच आरोपीला पकडून महिलेला सुरक्षित घरी पोहोचवले.

या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. आहे. लाठ्या घेऊन अनेक लोक घरात घुसताना व्हिडीओत दिसत आहेत. काही लोक घराबाहेर उभ्या असलेल्या मोटारीची तोडफोड करत आहेत. यानंतर एका व्यक्तीला घराबाहेर ओढून लाठ्या-काठ्याने मारहाण केली जाते.

Back to top button