औषधांचा ओव्हर डोस देऊन सासर्‍यानंतर तिने केली पतीची हत्या | पुढारी

औषधांचा ओव्हर डोस देऊन सासर्‍यानंतर तिने केली पतीची हत्या

कानपूर; वृत्तसंस्था :  उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पतीची कोट्यवधींची मालमत्ता हडप करून विवाहितेने आधी सासर्‍याला आणि नंतर पतीला औषधाचे ओव्हर डोस देऊन ठार मारल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली आहे. तीन महिन्यांपूर्वी तिने सासर्‍याचा असाच खून केला होता, तेव्हा कुणालाही संशय आला नव्हता. नंतर तिच्या प्रियकराने तिच्या पतीवर हल्ला केला, यात तो वाचला, रुग्णालयातून घरी आला. मग औषधांच्या ओव्हर डोसची सासर्‍यावर आजमावलेली पद्धत तिने अवलंबिली. दोन दिवसांनी पतीची तब्येत बिघडली. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. ऋषभ तिवारी असे मृताचे नाव आहे.

ऋषभच्या मृत्यूनंतर 13 दिवसांनंतर हा गुन्हा उघडकीला आला. ऋषभची पत्नी सपना आणि तिचा प्रियकर राज कपूर गुप्ता यांच्यातील व्हॉटस्अ‍ॅप चॅटवरून पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. ऋषभ औषधांच्या ओव्हर डोसचा त्रास होऊ लागला, तेव्हा सपनाने तिच्या प्रियकराला व्हिडीओ कॉल केला.

ऋषभ तडफडत असताना सपना-राजची चॅटिंग

सपना : लाल औषध दिले आहे, मरायला किती वेळ लागेल?
राज : 30 मिनिटांत काम होईल.
सपना : हो, तो आता तडफडतो आहे, बहुदा मरेलच.
राज : व्हिडीओ कॉल कर.
सपना : काय करावे समजत नाही
राज : घाबरू नको. त्याला दवाखान्यात ने. रडण्याचे नाटक कर.

Back to top button