पंजाबच्या तरनतारन येथील पोलिस ठाण्यावर ‘रॉकेट लाँचर’ सारख्या हत्याराने हल्ला

पंजाबच्या तरनतारन येथील पोलिस ठाण्यावर ‘रॉकेट लाँचर’ सारख्या हत्याराने हल्ला

पुढारी ऑनलाइन डेस्क : पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यावर रॉकेट लाँचर सारख्या हत्याराने हल्ला चढवला आहे. शनिवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. शुक्रवारी रात्री उशिरा हा हल्ला झाला. या हल्ल्यात पोलिस ठाण्यात दरवाजाची काच तुटली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमावर्ती जिल्ह्यातील अमृतसर-बठिंडा राजमार्गावर स्थित सरहाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा फायर केले गेले. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर मे महिन्याच्या सुरुवातीला रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड गोळीबार करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ऑक्टोबरमध्ये या प्रकरणातील एका सूत्रधाराला यूपीमधून अटक केली होती. आरोपी यूपीचा रहिवासी असून तो दहशतवाद्यांना मदत करत आहे. पंजाबच्या मोहाली येथील पोलिस इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयावर ९ मेच्या रात्री रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडने हल्ला करून इमारतीच्या एका मजल्यावरील खिडकीच्या काचा फोडल्या होत्या.

त्यानंतर शुक्रवारी रात्री सहराली पोलिस ठाण्यावर घडलेले हे या वर्षभरातील दुसरे प्रकरण आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news