File Photo
बेळगाव
बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला बंगळूरमध्ये घेराव
बंगळूर : महाराष्ट्रात काही ठिकाणी कन्नडिगांच्या मालमत्तांचे नुकसान केले जात असल्याचा आरोप करून काही कन्नड संघटनांनी येथील गांधीनगरातील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेला घेराव घालून निदर्शने केली.
महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे गुंड कन्नडिगांवर हल्ले करत आहेत. त्यांच्या दबावापुढे महाराष्ट्र पोलिस झुकले आहेत. कोणतीच कारवाई करताना दिसत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. कर्नाटक सेनेच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गांधीनगरात आंदोलन केले.

