SSC Notification 2022 : नोकरीची संधी; SSC मार्फत ४५०० पदांची भरती | पुढारी

SSC Notification 2022 : नोकरीची संधी; SSC मार्फत ४५०० पदांची भरती

पुढारी ऑनलाईन: मोदी सरकारकडून देशातील युवकांसाठी नोकर भरतीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या नोटिफिकेशनच्या माध्यमातून देशातील १२ वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे. नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC Notification 2022) साडेचार हजार पदांची अधिसूचना जारी केली आहे.

SSC CHSL 2022 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही सुद्धा १२ वी पास असाल तर, SSC ची वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज (SSC Notification 2022) करू शकता. उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ जानेवारी २०२३ आहे.

SSC CHSL Notification 2022

टियर-१ परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये

SSC CHSL 2023 च्या टियर-१ ची परीक्षा ऑनलाइन असेल. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च 2023 मध्ये ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. टियर-१ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी टियर २ परीक्षा देता येणार आहे. त्यांना याबाबत सांगितले जाईल.

SSC CHSL Notification 2022:  ‘या’ तारखा महत्त्वाच्या

  •  ऑनलाइन अर्ज करण्याची सुरूवातीची तारीख- 6 डिसेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2023
  • ऑनलाइन फी जमा करण्याची शेवटची तारीख – 5 जानेवारी 2023
  • चलनाद्वारे फी भरण्याची शेवटची तारीख – 6 जानेवारी 2023

‘या’ पदांची भरती

  • SSC CHSL 2022 द्वारे, केंद्र सरकार केंद्रीय कार्यालयात निम्न विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A पदांची भरती होणार आहे.

उमेदवाराचे वय आणि पात्रता

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण झालेला असावा.

मिळेल इतका पगार

  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – रु. 19,900-63,200 (वेतन स्तर -2 )
  • डेटा एंट्री ऑपरेटर – रु. 25,500-81,100 (वेतन स्तर 4) आणि रु. 29,200-92,30 (वेतन स्तर 5)
  • निम्न विभाग लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – रू.19,900-63,200 (वेतन स्तर-5 )
  • डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – रु. 25,500-81,100 (वेतन स्तर-4) आणि रु. 29,200-92,300 (वेतन स्तर-5 )
  • डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड- रु. 25,500-81,100 (A: वेतन स्तर-4)

Back to top button