सॉफ्टवेअर इंजिनिअरने केली डेंटल विद्यार्थिनीची निर्घृण हत्या | पुढारी

सॉफ्टवेअर इंजिनिअरने केली डेंटल विद्यार्थिनीची निर्घृण हत्या

गुंटूर वृत्तसंस्था :  ज्ञानेश्वर (24) या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने दंत चिकित्सा महाविद्यालयात शिकत असलेल्या तपस्वी (20) या त्याच्या मैत्रिणीचा सर्जिकल चाकूने वार करून खून केला. नंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
आंध— प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात ही घटना घडली.

दोघांची मैत्री सोशल मीडियावर झाली होती. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या काही दिवसांपासून तपस्वीने त्याच्याशी बोलणे सोडले होते. याउपर तो सतत मागावर राहत असल्याने तपस्वीने फिर्याद नोंदविली होती. तपस्वी गुंटूरलगत तक्केल्लापडू गावात मैत्रिणीसह राहत होती. ज्ञानेश्वर तेथे गेला. दोघांमध्ये वाद झाला. ज्ञानेश्वरने सर्जिकल चाकू काढला आणि तिच्या गळ्यावर वार केला. नंतर तिला रक्तबंबाळ अवस्थेत खोलीत घेऊन गेला आणि दार लावून घेतले. लोकांनी दरवाजा तोडल्यानंतर तो स्वत:च्या हाताची नस कापत असतानाच एका जमावाने त्याला ताब्यात घेतले.

Back to top button