

स्लो पॉईझनिंग तंत्राचा वापर करून जवळच्या नातलगांच्या खुनाच्या काही घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. या सर्व खून प्रकरणांमध्ये शस्त्र म्हणून थॅलियम हा राासायनिक पदार्थ वापरला गेला. स्लो पॉईझनिंगसाठी पोलोनियमही वापरले जाते; पण भारतात ते उपलब्ध होणे अत्यंत अवघड आहे. थॅलियम सहज उपबल्ध होते. उंदीर मारण्याच्या औषधातही थॅलियम वापरले जाते.
लक्षणे आणि उपचारांबद्दल
* स्लो पॉईझन म्हणून थॅलियमचा वापर का?
* कोणत्याही पदार्थात सहजपणे मिसळते
* हवेच्या संपर्कात ग्रे रंग उडून जातो
* स्वतःची अशी कोणतीही चव नसते
* अन्नात मिसळल्यानंतर चव बदलत नाही
* अन्नाचा रंगही बदलत नाही
घटना 1 : मुंबईत पत्नीने हळूहळू टप्प्या-टप्प्याने विष देऊन प्रियकरासोबत बिनधास्त राहाता यावे म्हणून उद्योजक पतीचा जीव घेतला. पतीच्या नाश्त्यात, जेवणात ती गेल्या अनेक दिवसांपासून विष कालवत होती; पण पतीला यातले काहीही कळले नाही. काही दिवसांनंतर त्याची प्रकृती बिघडली. रुग्णालयात उपचार सुरू झाले; पण तोवर उशीर झालेला होता. त्याचे सर्वच महत्त्वाचे अवयव निकामी झालेले होते. अखेर तो मरण पावला. घटनेनंतर मृताच्या बहिणीला वहिनीच्या प्रियकराबद्दल कुणकुण लागली आणि तिने पोलिसांना कळविले. तपास सुरू झाल्यानंतर हे भयावह वास्तव उजेडात आले.
घटना 2 : दिल्लीतही स्लो पॉईझनिंग तंत्र वापरून एकाने पत्नीसह सासू आणि मेहुणीचा खून केला होता.
घटना 3 : राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात पतीने अशाच पद्धतीने पत्नीचा खून केला होता.
थॅलियमचे परिणाम
* हलकी डोकेदुखी, उलट्या
* अतिसाराचा त्रास, सुरुवातीला ते नर्व्हस सिस्टिम कमकुवत करते
* एक एक अवयव निकामी करते
थॅलियमवर उपाय काय?
* पर्शियन ब्ल्यू हे थॅलियमवरील अँटिडॉट (प्रभावी औषध) मानले जाते.
* डायलिसीसच्या मदतीनेही किडनीतून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो.
* अर्थात पीडित व्यक्तीला आपणास थॅलियम दिले जाते आहे, हे बरेचदा कळतच नाही.
* सतर्कता हाच खरेतर यावरील सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे.