वकिली करतानाच रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितला किस्सा! | पुढारी

वकिली करतानाच रेडिओ जॉकी म्हणूनही काम केले; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितला किस्सा!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  आपण विशीत असताना वकिली करता करता रेडिओ जॉकी म्हणूनही काम करायचो व तीन कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही करायचो, अशी माहिती भारताचे सरन्यायाधीश न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमात दिली. हे सांगताना त्यांनी आयटी क्षेत्रात एकाच वेळी दोन नोकर्‍या करण्यासाठी वापरला जाणारा मुनलाईटिंग हा शब्द वापरल्याने उपस्थितांत हास्याची लकेर उमटली.

गोव्यातील एका कार्यक्रमात बोलताना न्या. चंद्रचूड यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही बाबी सांगितल्या. ते म्हणाले की, विशीत असताना आणि वकिली करत असताना आपण मुनलाईटिंग केले आहे. रेडिओ जॉकी म्हणून सूत्रसंचालन केले आहे. प्ले इट कूल, अ डेट विथ यू आणि संडे रिक्वेस्ट या रेडिओ शोसाठी जॉकी म्हणून काम केले आहे. संगीत लहानपणापासून आवडते. आजही हे प्रेम कमी झालेले नाही. कोर्टात वकिलांचे गाणे ऐकून घरी आलो की खरे संगीत लावतो आणि आनंद घेतो, अशी मिश्कील टिपणी त्यांनी केली.

Back to top button