

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सेमी हाय स्पीड रेल्वेच्या क्षेत्रात सुरू झालेल्या 'वंदे भारत' या रेल्वेची आता नवीन आवृत्ती येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. प्रवास सुखकर आणि वेगवान व्हावा यासाठी या दुसर्या आवृत्तीत काही बदल करण्यात आले असून आता ही रेल्वे अवघ्या 140 सेकंदांत 160 किमी प्रतितास वेग घेऊ शकणार आहे. नागपूर- बिलासपूर पाठोपाठ सिकंदराबाद ते विशाखापट्टणम रेल्वे जानेवारीत सुरू होणार आहे.