

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पुढील वर्षी होणार्या 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच त्यापाठोपाठ वर्ष 2024 मध्ये होणार्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या आढावा बैठकांना सोमवारी सुरुवात झाली.
बैठकांचे हे सत्र दोन दिवस चालणार असून त्यात पक्षाचे सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, राज्यांचे संघटन सरचिटणीस आणि वरिष्ठ नेत्यांचा राहणार आहे. गुजरातमध्ये सकाळी मतदान केल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्लीत आगमन झाले. पक्ष मुख्यालयात त्यांच्या हस्ते आढावा बैठकांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यालय पदाधिकार्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आढावा बैठकांना सुरुवात झाली. पुढील वर्षी मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, राजस्थान, तेलंगण, मिझोराम, नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपसाठी कमजोर ठरत असलेल्या मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.