आंध्र प्रदेशात सापडली 61 ग्रॅम वजनाची सोन्याची 18 नाणी | पुढारी

आंध्र प्रदेशात सापडली 61 ग्रॅम वजनाची सोन्याची 18 नाणी

अमरावती, वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी नजीक एका शेतात कूपनलिकेची खोदाई करत असताना पुरातन 18 सोन्याची नाणी सापडली आहेत. ही घटना अडुवाडाला पालेम गावातील आहे.

मनकोंडा सत्यनारायण नावाच्या व्यक्तीच्या कूपनलिकेसाठी खोदाई करण्यात येत होती. याचदरम्यान मातीच्या एका माठात ही नाणी मिळाली आहेत. यानंतर सत्यनारायण यांनी याची माहिती तहसीलदारांना दिली. त्यानंतर तहसीलदार पी. नागमणी शेतात पोहोचल्या. त्यानंतर स्थानिक लोकांच्या उपस्थितीत नागमणी यांनी ही नाणी ताब्यात घेतली. त्या म्हणाल्या, सत्यनारायण यांच्या शेतात 61 ग्रॅम वजनाची एकूण 18 नाणी सापडली आहेत. ही नाणी जिल्हाधिकार्‍यांच्या हाती सोपवून त्यानंतर ही नाणी कोषागरात जमा केली जातील. याबाबतची माहिती पुरातत्त्व विभागालाही देण्यात आली.

Back to top button