चुकून पाकिस्तानात शिरलेल्या भारतीय जवानाची अखेर सुटका | पुढारी

चुकून पाकिस्तानात शिरलेल्या भारतीय जवानाची अखेर सुटका

अमृतसर; वृत्तसंस्था :  सीमेवर गस्त घालताना चुकून पाकिस्तानी हद्दीत शिरलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले. या घटनेनंतर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांची बैठक झाल्यावर त्या जवानाची सुटका झाली.

पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमधील अबोहर येथे सीमेवर हा प्रकार घडला. तेथे गस्त घालणारा बीएसएफचा एक जवान दाट धुक्यामुळे चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला. तेथे त्याला पाक रेंजर्सने ताब्यात घेतले. इकडे जवान सीमेपलीकडे गेल्याचे कळाल्यावर बीएसएफचे अधिकारी सतर्क झाले त्यांनी पाकिस्तान रेंजर्सच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला. त्यांनी एक भारतीय जवान पकडल्याचे सांगितले. त्यानंतर दोन देशांच्या सैन्य अधिकार्‍यांची ध्वजबैठक झाली. त्यात सारा प्रकार कथन करण्यात आल्यानंतर त्या जवानाला सोडण्यात आले.

Back to top button