कोलकाता-बंगळूर विमानात बॉम्बची अफवा | पुढारी

कोलकाता-बंगळूर विमानात बॉम्बची अफवा

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा :  कोलकात्याहून बंगळूर केंपेगौडा विमानतळावर आलेल्या विमानात टिश्यू पेपरवर बॉम्ब असल्याचा संदेश मिळाला. या घटनेमुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. तातडीने विमान व परिसरात तपासणी करण्यात आली. कोणतीही संशयास्पद वस्तू न मिळाल्याने बॉम्बची अफवा असल्याचे उघड झाले.

सोमवारी सकाळी 8.10च्या दरम्यान कोलकात्यातील सुभाषचंद्र बोस विमानतळावरून 6 ई 379 हे इंडिगो विमान केंपेगौडा विमानतळावर पोहोचले. विमानात बॉम्ब असल्याचा संदेश लिहिलेले टिश्यू पेपर सापडल्यानंतर तत्काळ विमानतळ प्रशासनाला कळवण्यात आले. तातडीने पोलिस, बॉम्ब निकामी पथकाने येऊन तपास केला. काहीच न सापडल्याने बॉम्बची अफवा असल्याचे दिसून आले.

Back to top button