Mangaluru blast: कर्नाटक-केरळ-तामिळनाडू पोलीस करणार संयुक्‍त तपास | पुढारी

Mangaluru blast: कर्नाटक-केरळ-तामिळनाडू पोलीस करणार संयुक्‍त तपास

पुढारी ऑनलाईन : मंगळूर ऑटोरिक्षात झालेल्या बॉम्बस्फॉटप्रकरणी आम्ही तमिळनाडू आणि केरळ पोलिसांच्या संपर्कात आहे.  दहशतवाद्यांना शोधण्यासाठी आम्ही काम करत आहोत. या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास  कर्नाटकसह केरळ आणि तमिळनाडू यांच्‍या मदतीने करणार असल्याची  (Mangaluru blast) माहिती कर्नाटकाचे डीजीपी प्रवीण सूद यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मंगळूर ऑटोरिक्षा बॉम्बस्फोट प्रकरणातील (Mangaluru blast) आरोपी सय्यद यासीन, मज मुनीर अग्मेद आणि मोहम्मद शारीक यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. या स्‍फोटापूर्वी आरोपींनी कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील तुंगा नदीच्या काठावर स्फोटाचा सराव केली होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

स्फोटात (Mangaluru blast) आरोपींची मोठी योजना होती का? असे विचारले असता दहशतवादी कारवायांमुळे लोकांचे आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते; परंतु याहीपेक्षा देशातील विविध समुदायांमध्ये असंतोष निर्माण करणे, देश अस्थिर करणे आणि अशांतता निर्माण करणे हे देखील दहशतवादी कारवायांचे उद्दिष्ट असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मंगळुरू ऑटोरिक्षा स्फोट प्रकरणात एनआयए (NIA) आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणा तपासात सहभागी आहेत. या प्रकरणात आर्थिक व्यवहार असल्याने ‘ईडी’चा सहभाग आहे. या तपासात सध्या ‘ईडी’चा सहभाग औपचारिकरित्या असला तरी योग्यवेळी ‘ईडी’ त्याचा सहभाग दर्शवेल, असेही प्रवीण सूद यांनी स्‍पष्‍ट केले.

Back to top button