घरातून न सांगता गेली म्हणून बापाने मुलीची केली हत्या अन्... | पुढारी

घरातून न सांगता गेली म्हणून बापाने मुलीची केली हत्या अन्...

नवी दिल्ली :  काहीही न सांगता घरातून निघून गेली, याचा राग आल्यामुळे जन्मदात्या बापाने गोळी झाडून पोटच्या पोरीचा खून केला आणि तिचा मृतदेह बॅगमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली. ही धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे.

नितेश यादव असे संबंधित व्यक्तीचे नाव असून, मथुरा ठाण्याच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. 22 वर्षीय दुर्दैवी मुलीचे नाव आयुषी असे आहे. सकृतदर्शनी हे प्रकरण ‘ऑनर किलिंग’चे असल्याचे दिसत असले, तरी पोलिसांनी अजून त्याला दुजोरा दिलेला नाही. देशभरात सध्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच, आता तशीच भयंकर घटना दिल्लीत घडल्यामुळे राजधानी नखशिखांत हादरली आहे.

Back to top button