राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका : काँग्रेस पुनर्विलोकन याचिका दाखल करणार | पुढारी

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका : काँग्रेस पुनर्विलोकन याचिका दाखल करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सहा दोषींची नुकतीच सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाविरोधात काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने पुनर्विलोकन याचिका दाखल केली जाणार आहे. नलिनी श्रीहरन यांच्यासह सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. गुन्हेगारांना शिक्षा माफ करण्याच्या तामिळनाडू सरकारने केलेल्या शिफारशीच्या आधारे न्यायालयाने हा आदेश दिला होता.

काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषींच्या सुटकेला आव्हान देणारी पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. सहा मारेकऱ्यांची सुटका करणे हे दुर्दैवी आणि अस्वीकार्य असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्यावेळी राजीव गांधी हत्याप्रकरणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणातील दोषींना सोडण्याच्या निर्णयावर केंद्राने पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. माजी पंतप्रधानांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचीही बाजू ऐकायला हवी होती, असे याचिकेत म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button