Rajiv Gandhi Assassination: ‘निर्दोषतेवरील विश्वासाने मी जिवंत राहिले’, राजीव गांधींची मारेकरी नलिनीची प्रतिक्रिया | पुढारी

Rajiv Gandhi Assassination: ‘निर्दोषतेवरील विश्वासाने मी जिवंत राहिले’, राजीव गांधींची मारेकरी नलिनीची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनी श्रीहरन आणि इतर चार दोषींची शनिवारी संध्याकाळी तामिळनाडूतील वेल्लोर तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर या हत्येतील सहा दोषींपैकी एक असलेली नलिनी श्रीहरन पहिल्यांदाच माध्यमांना सामोरी गेली आणि धक्कादायक प्रतिक्रीया दिली. ती म्हणाली, ‘माझ्या निर्दोषतेवरील विश्वासानेच मी तुरुंगात तीन दशके जिवंत राहिले.’

ती म्हणाली, गेले 32 वर्षे मी तुरुंगात नरक अनुभव. मी निर्दोष आहे या माझ्या खात्रीनेच मला इतकी वर्षे जिवंत ठेवले आहे. नाहीतर मी माझे जीवन संपवले असते. मी माजी पंतप्रधानांची हत्या केली असे तुम्हाला वाटते का? माझ्याविरुद्ध सतरा हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे तिने पत्रकारांना सांगितल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. राजीव गांधी हत्या प्रकरणातील सहा दोषींना सोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर एक दिवसानंतर नलिनीने तुरुंगातून बाहेर येताच माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी तिने धक्कादायक प्रतिक्रिया दिली.

तुरुंगातून सुटल्यानंतर नलिनी पती मुरुगनला भेटण्यासाठी वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात गेली. आदल्यादिवशी, तिला पोलिसांनी काटपाडी पोलीस ठाण्यात सही करण्यासाठी नेले होते. दुपारनंतर, तिच्या सुटकेशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यात आली आणि तिला पुन्हा वेल्लोर कारागृहात नेण्यात आले. यानंतर तिची सुटका करण्यात आली.

मला गांधी कुटूबियांबद्दल अतिशय दु:ख

तमिळनाडूत झालेल्या स्फोटाविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. राजीव गांधींविषयी विचारले असता मला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटत आहे. आम्ही याबद्दल विचार करत इतकी वर्षे घालवली आणि आम्हाला त्याबद्दल अतिशय दु:ख वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. पुढे त्यांना राजीव गांधी यांच्या कुटुंबाला भेटण्याविषयी विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘मला वाटत नाही की ते मला भेटतील. कारण, भेटायची वेळ आता निघून गेली आहे’ सध्यातरी गांधी कुटूंबाला भेटण्याचे नसल्याचेही आरोपी म्हणााले.

सहकार्य करणाऱ्यांचे मानले आभार

नलिनीने यावेळी बोलताना राज्य आणि केंद्र सरकारसह तामिळनाडूच्या जनतेचे आभार मानले. ती म्हणाली, अनेक प्रेमळ, दयाळू लोकांच्या माझी तुरुंगातून सुटका करण्यस प्रयत्न केले याचा मला आनंद आहे. मी तुम्हा सगळ्यांची आभारी आहे.’

तुरुंगातील जीवनातून काही धडा मिळाला का असे विचारले असता नलिनी म्हणाली, हा एक अनोखा अनुभव आहे, जो कोणीही शिकवू शकत नाही. या काळात मी संयम आणि सहनशीलता शिकले.’

Back to top button