सातारा : अफजल खान कबर अतिक्रमण कारवाई, भवानी तलवार विषयी उदयनराजे म्हणाले… (पाहा व्हिडिओ) | पुढारी

सातारा : अफजल खान कबर अतिक्रमण कारवाई, भवानी तलवार विषयी उदयनराजे म्हणाले... (पाहा व्हिडिओ)

सातारा : पुढारी वृत्तसेवा: (व्हिडीओ इम्तियाज मुजावर) छ्त्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार इंग्लंडच्या सरकारकडे संग्राहलायत आहे. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारी आहे. भारताचा तसाच महाराष्ट्राचं स्वाभिमान आहे यामुळं जनभावना लक्षात घेऊन ही तलवार मोठ्या मनानं ब्रिटिश सरकारनं भारताकडं सोपवली पाहिजे, असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी साता-यात व्यक्त केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत. बावनकुळे यांनी आज खासदार उदयनराजे भाेसले यांची भेट घेतली. जलमंदिर पॅलेस येथे दाेन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर बावनकुळे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या भेटीला सुरुची बंगला येथे रवाना झाला. माध्यमांशी बाेलताना उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारी आणि भारताचा तसाच महाराष्ट्राचं स्वाभिमान असणारी भवानी तलवार मोठ्या मनानं ब्रिटिश सरकारनं भारताकडं सोपवली पाहिजे असं म्हटलं.

अफजल खान कबरी शेजारील काढलेलं अतिक्रमण हे योग्यच असून राज्य सरकारनं कायद्याचा आधार घेऊन केलेली कारवाई योग्यच आहे. त्यांच्या या भूमिकेला समर्थन आहे. या कारवाईला राजकीय वळण नकाे अशी भावना राजेंनी व्यक्त केली. (अफजल खान कबर)

प्रतापगडावरील अफजल खान कबर ही लोकांसाठी खुली केली पाहिजे असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले लोकांना आणि युवा पिढीला इतिहास कळावा यासाठी ही कबर लाेकांना पाहण्यासाठी खूली केली पाहिजे. त्याचा राज्य सरकारनं विचार करावा असंही उदयनराजेंनी नमूद केले.

हे ही वाचा :

अफजलखान कबरीचा वाद सर्वोच्च न्यायालयात; आज होणार सुनावणी

सातारा : प्रतापगडावरील अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवले (Video)

Back to top button