

पुढारी ऑनलाइन डेस्क : Railway Crossing Video : रेल्वे पटरी पार करताना अचानक मालगाडी आली. त्यामुळे तो ट्रॅकवरच उभा झोपला आणि संपूर्ण मालगाडी त्याच्यावरून गेली. तरी तो जीवंत राहिला. याचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.
Railway Crossing Video : बिहारच्या भागलपूरच्या कहलगांव रेल्वे स्टेशनवरील आहे. एक व्यक्ति एका प्लॅटफॉर्मवरून दुस-या प्लॅटफॉर्मवर जात असताना ओवरब्रिजवरून जाण्याऐवजी लवकर पोहोचण्यासाठी पटरी पार करण्याचा शॉर्टकट घेतला. पटरीवर त्यावेळी मालगाडी थांबली होती. त्याने मालगाडी खालून जाण्याचा विचार केला. तो मालगाडी खाली गेला आणि त्याचवेळी रेलगाडी सुरू झाली आणि तो मध्येच अडकला. त्यानंतर थरार सुरू झाला.
Railway Crossing Video : काळ आला होता पण वेळ आली नव्हतीचा अनुभव
आपल्याकडे काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी एक म्हण आहे. जे लोक मृत्यूच्या तावडीतून वाचतात त्यांच्याबाबतीत आपण असे म्हणतो. असाच अनुभव या व्यक्तिनेही घेतला. रेल्वेगाडी निघाल्याने त्याने पटरीवर उभा झोपला. त्यावेळी लोक त्याला ओरडून ओरडून म्हणत होते की पटरीवर झोपून राहा. ही व्यक्ती पोटावर उलटा पटरीवर पडून राहिला. त्यावेळी पूर्ण मालगाडी निघून गेली. त्यानंतर ही व्यक्ति सुरक्षित बाहेर पडला. त्यानंतर तिथे उभे असलेल्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हे ही वाचा: