Himachal pradesh poll : हिमाचलमध्‍ये काँग्रेसला मोठा झटका, २६ नेते भाजपमध्‍ये दाखल | पुढारी

Himachal pradesh poll : हिमाचलमध्‍ये काँग्रेसला मोठा झटका, २६ नेते भाजपमध्‍ये दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. येथे मतदान चार .दिवसांवर येवून ठेपले असतानाच काँग्रेस कमेटीचे माजी महासचिव धर्मपाल ठाकूर यांच्‍यासह २६ नेते भाजपमध्‍ये दाखल झाले आहेत. हा काँग्रेससाठी मोठा धक्‍का मानला जात आहे. ( Himachal pradesh poll )

हिमालच प्रदेश विधानसभेच्‍या एकुण ६८ जागांसाठी १२ नोव्‍हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. सोमवारी काँग्रेसच्‍या २६ नेत्‍यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्‍यमंत्री जयराम ठाकुर आणि भाजपचे निवडणूक प्रभारी सुधन सिंह यांच्‍या उपस्थिती भाजपमध्‍ये प्रवेश केला. या वेळी भाजपचे सिमला मतदारसंघातील उमदेवार संजय सूद उपस्थित होते.

काँग्रेसचे माजी महासचिव धर्मपाल ठाकूर, माजी सचिव आकाश सैनी, राजन ठाकूर, माजी जिल्‍हाध्‍यक्ष अमित मेहता, मेहर सिंह कंवर, राहुल नेगी, जाोगिंदर ठाकूर, नरेश वर्मा, गजेंद्र सिंह, राकेश चाौहान, धर्मेंद्र कुमार, वीरेंद्र शर्मा, राहुल रावत, साोनू शर्मा, अरुण कुमार, शिवम कुमार, गाोपाल ठाकुर, चमन लाल, देवंद्र सिंह, महेंद्र सिंह, मुनीश मंडला, बालकृष्‍ण बाॉबी, सुनील शर्मा, सुरेंद्र ठाकुर, संदीप समता यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला आहे.

काँग्रेस नेत्‍यांचा भाजप प्रवेशाचा फोटो मुख्‍यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्वीट केला. त्यांनी म्‍हटलं आहे की, आज काँग्रेसमधील काही नेत्‍यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला. भाजप परिवारात सर्वांचे हार्दिक स्‍वागत आणि अभिनंदन. भाजप राज्‍यात ऐतिहासिक विजयासह एकतेसाठी काम करेल.

Himachal pradesh poll : भाजप सत्ता अबाधित ठेवणार?

मागील काही दशकांमध्‍ये हिमाचल प्रदेशमधील जनतेने दर पाच वर्षांनी भाजप आणि काँग्रेसकडे सत्ता दिली आहे. २०१७ च्‍या विधानसभा निवडणुकीत ६८ जागांपैकी भाजपला ४४, काँग्रेसला ३१ जागा मिळाल्‍या होत्‍या तर २०१२ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ३६ तर भाजपला २६ जागा मिळाल्‍या होत्‍या. आता सर्वांचे लक्ष राज्‍यात सत्तांतर होणार की, भाजप सत्ता अबाधित ठेवणार? याकडे लागले आहे.

 

 

 

Back to top button