पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले अडवाणींचे आशीर्वाद; भेट घेत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले अडवाणींचे आशीर्वाद; भेट घेत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुढारी ऑनलाईन : देशाचे माजी गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा आज वाढदिवस आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अडवाणी यांच्या दिल्लीतील निवास्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी या दोघांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, लालकृष्ण अडवाणी यांचे आशीर्वादही घेतले. यावेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मंगळवारी वयाची ९५ वर्षे पूर्ण करत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्वपक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी आणि भारतातील अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी अडवाणी यांना वाढदिवसाच्या  शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सुमारे एक तास अडवाणी यांच्यासोबत व्यतित केला. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना देश, समाज आणि भाजपच्या विकास यात्रेत अडवाणी यांचे योगदान अतुलनीय असल्याचे सांगितले.

लालकृष्ण अडवाणींचा प्रवास थोडक्यात…

सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतात अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी झाला होता. कराचीमध्ये त्यांचे शिक्षण झाले. मात्र फाळणीनंतर त्यांना भारतात यावे लागले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. वयाच्या 14 व्या वर्षी ते जनसंघाशी जोडले गेले होते. त्यानंतर 1977 मध्ये ते जनता पार्टीत आले. भाजपच्या संस्थापक सदस्यांमध्ये अडवाणी यांचा समावेश होतो. राम मंदिराच्या निर्माणासाठी 1990 साली काढलेल्या रथयात्रेमुळे लालकृष्ण अडवाणी यांना देशव्यापी प्रसिध्दी मिळाली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहानींही दिल्या शुभेच्छा

गृहमंत्री अमित शहा यांनीही ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करत, अडवाणींना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना केली आहे. अडवाणींनी आपल्या अथक परिश्रमाने देशभरातील पक्ष संघटना मजबूत केल्याचेही ते म्हणाले. यासोबतच त्यांनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले असल्याचे मत अमित शहा यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button