पुणे : माजी अपर आयुक्त ताब्यात

पुणे : माजी अपर आयुक्त ताब्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणात नांदेड वाघाळा महानगरपालिकेतून सेवानिवृत्त अपर आयुक्त रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी (62,रा. शारदानगर, नांदेड) यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाला नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पुणे एसीबीच्या मदतीने पुण्यातील कर्वेनगर येथील राहत्या घरातून शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जेरबंद केले.  गगराणी यांच्यासह जयश्री रामनारायण गगराणी (57) आणि प्रथमेश रामनारायण गगराणी (34 सर्व रा. शारदानगर, नांदेड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गगराणी यांच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातील वजिराबाद पोलिस ठाण्यात अपसंपदा बाळगल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गगराणी यांनी 2010 ते 2016 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर माया जमविल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून ज्ञात उत्पन्नापेक्षा 28 लाख 72 हजारांची अपसंपदा जमविल्याचा ठपका ठेवत ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news