‘राज्यपाल पद अनावश्यक’; ‘सीपीआय’चे महासचिव डी. राजा यांचे विधान | पुढारी

'राज्यपाल पद अनावश्यक'; 'सीपीआय'चे महासचिव डी. राजा यांचे विधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे महासचिव डी. राजा यांनी राज्यपाल पदाबाबत मोठे विधान केले आहे. तामिळनाडू आणि केरळ राज्याचे राज्यपाल सरकारच्या विरोधात निर्णय घेत आहेत. राज्यपालांकडून बहुमताने सत्तेत असलेल्या सरकार विरोधात निर्णय घेतले जात असतील, तर राज्यपाल पदाची आवश्यकता आहे का? असा सवाल डी. राजा यांनी उपस्थित केला आहे. सध्याच्या घडीला राज्यपाल पद अनावश्यक झाले असल्याचे डी.राजा म्हणाले. ते एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

डी.राजा म्हणाले, “भारतात घटनात्मक लोकशाही आहे. भारत राज्यांचा संघ आहे. त्यामुळे राज्यपाल पद बरखास्त केले पाहिजे. ही फक्त माझ्या पक्षाची मागणी नाही. देशातील अनेक नेत्यांकडून ही मागणी होत आहे.”

देशात अनेक ठिकाणी राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये वाद सुरू आहे. त्याचे तामिळनाडू हे उत्तम उदाहरण आहे. राज्यपालांची नियुक्ती राजकीय हेतूने केली जाते. राज्यपाल पदाचा राजकीय वापर केला जात आहे. हे योग्य नाही. राज्यपाल पद आवश्यक आहे का? याबाबत संसदेत चर्चा झाली पाहिजे, असेही डी.राजा यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचलंत का?

Back to top button