Invest Karnataka 2022 | जगात अनिश्चितता, पण भारताची प्रगती वेगाने : पंतप्रधान नरेंद्र मोदी

G20 Bilateral Ties
G20 Bilateral Ties
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक स्तरावर अनिश्चितता आहे. पण भारताची प्रगती वेगाने होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी (दि.२) 'इन्व्हेस्ट कर्नाटक २०२२' (Invest Karnataka 2022) च्या उद्घाटन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. "हा जरी जागतिक संकटाचा काळ असला तरी जगभरातील तज्ज्ञ, विश्लेषक आणि आर्थिक तज्ज्ञ भारताला उज्ज्वल स्थान असल्याचे सांगत आहेत. आम्ही आमच्या मूलभूत गोष्टींवर सातत्याने काम करत आहोत, जेणेकरून भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस आणखी मजबूत होईल. गेल्या वर्षी भारतात सुमारे ८४ अब्ज डॉलरची विक्रमी थेट परकीय गुंतवणूक (Foreign direct investment) झाली आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, जागतिक तज्ज्ञांनी भारताचे एक उज्ज्वल स्थान म्हणून कौतुक केले आहे. बंगळूर शहर एक प्रतिभा आणि तंत्रज्ञान केंद्र आहे. आज कर्नाटकाकडे डबल इंजिन सत्ता आहे. Ease Of Doing Business मध्ये कर्नाटकने टॉप रँकर्समध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. फार्च्यून ५०० कंपन्यांपैकी ४०० कर्नाटकात आहेत. भारतात १०० हून अधिक यूनिकॉर्नमधील ४० हून अधिक कर्नाटकातील आहेत. कर्नाटक हे एक असे ठिकाण आहे, जिथे परंपरा आणि तंत्रज्ञानही आहे. हे असे ठिकाण आहे जे केवळ त्याच्या अद्भुत वास्तुकलेसाठीच नाही तर त्याच्या गतिशील स्टार्टअपसाठीदेखील ओळखले जाते.

आज जगातील इंडस्ट्री ४.० च्या दिशेने मार्गक्रमन करत आहे. भारतीय युवकांनी गेल्या वर्षी आपल्या इथे १०० हून अधिक युनिकॉर्न स्टार्टअप्स बनवली आहेत. भारतात ८ वर्षात ८० हजारहून अधिक स्टार्टअप्स बनवली असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. १ अब्ज डॉलर अथवा त्याहून अधिक बाजारमूल्य असणाऱ्या कंपनीला युनिकॉर्न स्टार्टअप संबोधले जाते.

कर्नाटकातील गुंतवणूकदारांच्या मेळाव्याला 'इन्व्हेस्ट कर्नाटक २०२२' असे नाव देण्यात आले आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि पुढील दशकासाठी विकासाचा अजेंडा सेट करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. (Invest Karnataka 2022)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news