World Longest Passenger Train : स्वित्झर्लंडमध्‍ये जगातील सर्वात मोठ्या पॅसेंजर रेल्वेची सेवा सुरु ; १०० डबे, ४५५० आसन व्यवस्था | पुढारी

World Longest Passenger Train : स्वित्झर्लंडमध्‍ये जगातील सर्वात मोठ्या पॅसेंजर रेल्वेची सेवा सुरु ; १०० डबे, ४५५० आसन व्यवस्था

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्राकृतिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध असणारे स्वित्झर्लंड आता जगातील सर्वात मोठ्या पॅसेंजर रेल्वेसाठी देखील ओळखला जाणार आहे. स्विर्झलँडने नुकतेच १.९ किलोमीटर इतकी लांब रेल्वे धावणार असल्याचे घोषित केले आहे. स्वित्झर्लंड रॅटियन रेल्वेने दावा केल्याप्रमाणे ही जगातील सर्वात लांब रेल्वे असणार आहे. (World Longest Passenger Train)

रेल्वेमध्ये १०० डबे आणि ४५५० आसन व्यवस्था

मीडिया रिपोर्ट्नूसार, या रेल्वेमध्ये १०० डब्बे आणि ४५५० आसन व्यवस्था केली आहे. तसेच ही रेल्वे चालविण्यासाठी सात चालक असणार आहेत. आल्प्स पर्वताच्या नैसर्गिक सौंदर्याची सफर ही रेल्वे करणार आहे. स्वित्झर्लंडची ही रेल्वे संपूर्ण जगभरामध्ये आकर्षक ठरली आहे. (World Longest Passenger Train)

Image

या रेल्वेचा असेल हा नैसर्गिक सौंदर्य मार्ग

ही रेल्वेचा मार्ग हा पुढे दिलेल्या सुंदर ठिकांणाचा असेल. अल्बुला/ बर्निना हे ठिकाण आहे. जिथे २२ बोगदा आणि ४८ पूल असणार आहेत. अल्बुला/ बर्निनाला २००८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसास्थळामध्ये समावेश केला आहे. हा स्वित्झर्लंडच्या सर्वोत्तम मार्गापैकी एक आहे. इथे दरवर्षी लाखो पर्यटक इथल्या नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. हे संपूर्ण ठिकाण फिरण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो. (World Longest Passenger Train)

Image

पर्यटनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल

स्वित्झर्लंडची सुंदर ठिकाणे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. त्यामुळे स्वित्झर्लंडच्या अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळाले आहे. स्वित्झर्लंडच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार, या ट्रेनच्या माध्यमातून स्वित्झर्लंडचे सुंदर ठिकाणे जगाला दाखवायची आहेत. ते म्हणाले की, कोविड महामारीमुळे रेल्वेच्या कमाईवर परिणाम झाला आहे. आता नव्‍या ट्रेनच्या माध्यमातून आम्हाला जगभरातील पर्यटकांना आकर्षित करायचे आहे. यापूर्वी 1991 मध्ये बेल्जियममध्ये 1.7 किमी लांबीची ट्रेन धावली होती.

हेही वाचा

Back to top button