भाजप कार्यालयाचे बांधकाम : दिल्ली सरकारकडून एल अँड टी कंपनीला ५ लाखांचा दंड | पुढारी

भाजप कार्यालयाचे बांधकाम : दिल्ली सरकारकडून एल अँड टी कंपनीला ५ लाखांचा दंड

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी (दि.१) एल अँड टीच्या एका बांधकाम स्थळाचे पाहणी केली. यावेळी बांधकाम स्थळी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाच्या विस्ताराचे काम सुरू असल्याचे आढळून आल्याने पर्यावरण मंत्र्यांनी कंपनीवर पाच लाखांचा दंड ठोठावला.

राजधानीत वाढत्या वायू प्रदूषणामुळे दिल्ली तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात बांधकामांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यातील वायू गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीत पोहचली आहे. अशात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य सरकारने ही दंडात्मक कारवाई केली आहे. भाजप केंद्रीय कार्यालयाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. परंतु, नवीन निर्बंधांमुळे तूर्त बांधकामाचे काम रखडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एक्यूआयची ढासळती गुणवत्ता लक्षात घेता दिल्ली प्रदेश काँग्रेसने राज्यातील शाळा बंद करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी मंगळवारी ट्विट करीत ही मागणी केली. केजरीवाल यांनी नोटंकी बंद करावी. दिल्लीत आरोग्यासंबंधी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. वृद्धांना घराबाहेर न निघण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु, प्राणघात प्रदूषणाच्या मुद्दयावरून लक्ष भरकटवण्यासाठी केजरीवाल योगशाळेच्या मुद्यावर राजकारण करीत असल्याचा आरोप चौधरी यांनी करीत शाळा बंद करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button