तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती केल्या जाहीर; जाणून घ्या आजचे दर | पुढारी

तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती केल्या जाहीर; जाणून घ्या आजचे दर

पुढारी ऑनलाइन डेस्क: सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या पाच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल 21 मे 2022 रोजी झाला होता.

देशातील मोठ्या महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लीटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत 106.31 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.27 रुपयांना मिळत आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

लखनौ, पाटणासह इतर शहरांमध्ये आज पेट्रोल-डिझेलचे दर
लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 89.76 रुपयांना उपलब्ध आहे.
पाटणामध्ये पेट्रोल 107.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.86 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
जयपूरमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 108.32 रुपये आणि डिझेलची किंमत 93.58 रुपये आहे.
चंदीगडमध्ये एक लिटर पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर आहे.
बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर आहे.
नोएडामध्ये एक लिटर पेट्रोल 96.92 रुपयांना आणि डिझेल 90.08 रुपयांना मिळत आहे.
गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.04 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.91 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.

कच्च्या तेलात घसरण
शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. कच्चे तेल $ 0.61 किंवा 0.64 टक्क्यांनी घसरून $ 94.43 च्या आसपास व्यवहार करत आहे. पूर्वी, OPEC+ देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज 2 दशलक्ष बॅरल कपात केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उडी दिसून आली होती.

Back to top button