तूम्ही ही व्हॉट्सअॅप यूजर आहात? पहा हे नवे बदल. | पुढारी

तूम्ही ही व्हॉट्सअॅप यूजर आहात? पहा हे नवे बदल.

पुणे: पुढारी वृत्तसेवा

तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. WABetaInfo ने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये व्हॉट्सअॅपमध्ये काही बदलांचे संकेत देण्यात आले आहेत. अहवालात सांगितल्यानुसार, लवकरच अॅप फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. हा बदल सध्याच्या नव्या अपडेटमध्ये करण्यात आलेला नाही. परंतु WABetainfo चा दावा आहे की अॅंड्रॉइड उपकरणांसाठी नवीन बीटा अपडेट व्हॉट्सअॅप वर फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

RBI : डिजिटल चलन म्हणजे नेमकं काय? 

टू-स्टेप व्हेरिफिकेशनवरही काम चालू

आधीच्या अहवालात सांगितल्याप्रमाणे, फेसबुकच्या मालकीचे इतर अॅप्स त्यांच्या डेस्कटॉप अॅप आणि वेब व्हर्जनमध्ये टू स्टेप्स व्हेरिफिकेशनचा समावेश करण्यावर काम करत आहे. या व्हेरिफिकेशन प्रक्रियेमुळे वापरकर्त्यांना अधिक सुरक्षा मिळेल. ही प्रक्रिया दोन्ही व्हर्जनमध्ये सहजरित्या चालेल. जर एखाद्या वापरकर्त्याचा मोबाईल हरवला असेल, तर तो त्याचे अकाउंट डेस्कटॉपवर ही उघडू शकतो. यामुळे व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना सुरक्षेच्या दृष्टिने अधिक चांगली सुविधा मिळणार आहे.

Union Budget 2022 : २५ हजार किलोमीटर महामार्गाचा होणार विस्‍तार

लवकरच नवीन फिचर येणार

टू स्टेप व्हेरिफिकेशन सुविधा सध्या मोबाइल अॅप व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे, ज्यासाठी अॅपवर तुमचा फोन नंबर नोंदवण्यासाठी वैयक्तिक पिन टाकावा लागतो. परंतु सध्या व्हॉट्सअॅप अशा फिचरवर काम करत आहे ज्यामुळे वापरकर्त्यांना अॅंड्रॉइड डिव्हाइसवरून स्वतःचे अकाउंट आणि जुने चॅट आयफोन वर स्थलांतरित करण्याची सुविधा मिळेल.

Budget 2022 : ई-पासपोर्ट लवकरच होणार जारी!

ही सुविधा उपलब्ध

कोविड 19 लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागरिकांना सहज लस मिळावी यासाठी व्हॉट्सअॅप एक सुविधा देत आहे. यासाठी तुम्हाला एका हेल्पलाइन नंबरवर संपर्क करावा लागेल. यानंतर, साध्या सूचनांद्वारे सांगितलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला त्वरित लस मिळेल. तसेच लसीकरणाचे प्रमाणपत्र ही व्हॉट्सअॅपद्वारे मिळेल.

Back to top button