Bharat Jodo Yatra : ‘भारत-जोडो’चा कर्नाटकातील टप्पा पूर्ण; तेलंगणात प्रवेश | पुढारी

Bharat Jodo Yatra : ‘भारत-जोडो’चा कर्नाटकातील टप्पा पूर्ण; तेलंगणात प्रवेश

हैदराबाद; वृत्तसंस्था : काँग्रेसच्या ‘भारत-जोडो’ यात्रेचा कर्नाटकमधील टप्पा रविवारी पूर्ण झाला. त्यानंतर यात्रेने तेलंगणामध्ये प्रवेश केला. ही यात्रा महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर तिचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार करणार आहेत. (Bharat Jodo Yatra)

रविवारी सकाळी ही यात्रा कर्नाटकातील यरमारस येथून सुरू झाली. नंतर महबूबनगरला पोहोचली आणि त्यानंतर तेलंगणामध्ये प्रवेश केला. तेलंगणामध्ये ही यात्रा 16 दिवस थांबणार आहे. मकथल, नारायणपेठ, कोंडगल, पारगी, विकाराबाद, सादाशिव पेठ, शंकरपेठ आणि मदूर असा 376 किलोमीटरचा टप्पा ‘भारत-जोडो’ यात्रा करणार आहे. त्यानंतर ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. (Bharat Jodo Yatra)

पवार म्हणाले, ‘भारत-जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर मी स्वागत करणार आहे. यात्रेच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवण्याचे प्रयत्न केले जात आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी 7 नोव्हेंबरला ‘भारत-जोडो’ यात्रेत सहभागाचे निमंत्रण दिले होते (Bharat Jodo Yatra)

Back to top button