Diwali Festival : नरक चतुर्दशीच्या दिवशी यमतर्पण का करावे? | पुढारी

Diwali Festival : नरक चतुर्दशीच्या दिवशी यमतर्पण का करावे?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Diwali Festival : दीपोत्सवातील धनत्रयोदशी नंतर येणारा दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवशीपासून अभ्यंग स्नान करायला सुरुवात होते. याशिवाय या दिवशी यमतर्पण करण्याचेही महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार अकाल मृत्यू टाळण्यासाठी यमतर्पण केले जाते.

Diwali Festival : आख्यायिका 

धार्मिक मान्यतेनुसार, नरकासुराने 16 हजार 108 राजकुमारींना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रियांची मुक्तता केली. युद्धातील पराजयानंतर मृत्युसमयी नरकासुराला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.

Diwali Festival : अभ्यंग स्नानाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व 

मात्र, याशिवाय अभ्यंग स्नानाचे शास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टीने देखिल महत्व आहे. शरद् ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करतो. यादिवसापासून साधारणपण थंडीची चाहूल लागते. वातावरणात बदल होतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडायला लागते. आदी त्वचेशी संबंधित त्रास होऊ नये. म्हणून आरोग्यदायी अभ्यंग स्नान करण्याची पद्धत नरक चतुर्दशी पासून सुरू होते. ती पुढे येणाऱ्या थंडी संपेपर्यंत केले जाते.

Diwali Festival : अभ्यंग स्नानाचे आरोग्यासाठी ‘हे’ आहेत फायदे

Diwali Festival : जाणून घ्या नरक चतुर्दशी रविवारी की सोमवारी 

हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.04 वाजता सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:28 पर्यंत चालेल. उदय तिथीनुसार 24 ऑक्टोबर रोजी छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशी साजरी केली जाईल.

Diwali Festival : अकाल मृत्यू टाळण्यासाठी करा यमतर्पण 

धार्मिक मान्यतेप्रमाणे या दिवशी अकाल मृत्यू टाळण्यासाठी यमतर्पण करायचे असते. दाते पंचांग यांनी यमतर्पणाविषयी माहिती दिली आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढतो. त्यामुळे नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यू निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे. अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाला खालील 14 नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करण्यास सांगितले आहे.

वडील हयात असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व नसलेल्यांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी तर्पण करावे.

1) यम 2) धर्मराज 3) मृत्यु 4) अंतक 5) वैवस्वत 6) काल 7) सर्वभूतक्षयकर 8) औदुंबर 9) दध्न 10) नील 11) परमेष्ठिन 12) वृकोदर 13) चित्र 14) चित्रगुप्त

हे ही वाचा :

Diwali Festival : अभ्यंग स्नानासाठी असं बनवा घरच्या घरी सुगंधी उटणं

Back to top button