Digital Fraud : दिवाळी कॅशबॅक नावाने ऑनलाईन लूटबाजी; जाणून घ्या कोठे करायची तक्रार | पुढारी

Digital Fraud : दिवाळी कॅशबॅक नावाने ऑनलाईन लूटबाजी; जाणून घ्या कोठे करायची तक्रार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजच्या युगात सर्व काही डिजिटल झाले आहे. डिजिटल माध्यमांमुळे लोकांना सोयी घर बसल्या उपलब्ध झाल्या आहेत. पण, त्याचा वापर सजगपणे केला जात नाही. त्यामुळे याच सोयींमुळे लोक अडचणीत सापडत आहेत. दररोज अनेक लोक सायबर फसवणुकीला बळी पडत आहेत. डिजिटल व्यवहार केल्यास क्रेडिट, डेबिट कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही, ओटीपी विचारून फसवणूक करणाऱ्यांच्या ते निशाण्यावर आहेत. (Digital Fraud)

कॅशबॅकच्या नावाखाली फसवणूक (Digital Fraud)

जर सायबर चोरांनी तुमच्या खात्यात घुसून तुम्हा चुना लावला असेत, तर तुम्ही ताबडतोब योग्य ती पावले उचलून पोलिसांकडे तक्रार करा, यामुळे तुम्हाला तुमची रक्कम परत मिळणे शक्य आहे. वास्तविक, सणासुदीच्या काळात कधी कॅशबॅकच्या नावावर तर कधी केवायसीच्या नावाखाली युजर्सचे खात्यावरील रक्कम उडवली जात आहे. कारण तुमची छोटीशी चूक मोठ्या नुकसानीचे कारण बनू शकते.

गृह विभागाने पुढाकार घेतला

अनेकदा डिजिटल पद्धतीने लुटले गेल्यावर लोकांना समजत नाही की काय करावे? अशा परिस्थितीत लोकांची आयुष्यभराची कमाई त्यांच्या खात्यातून रिकामी केली जाते. अशा परिस्थितीत आता गृह विभागाने तुमच्या सुरक्षेसाठी एक उपक्रम सुरू केला आहे, जेणेकरून ग्राहकांना याचा लाभ मिळेल. (Digital Fraud)

गृह मंत्रालयाच्या सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार

सायबर फसवणूक झाल्यास, तुम्ही ताबडतोब 1930 क्रमांकावर कॉल करा. तक्रार नोंदवल्यानंतर, तुमचे पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता अधिक असते. हा क्रमांक गृह मंत्रालयाच्या सायबर क्राईम पोर्टलचा केंद्रीकृत क्रमांक आहे. जो संपूर्ण देशात लागू आहे. तसेच, गृह मंत्रालयाच्या सायबर क्राईम पोर्टलवर cybercrime.gov.in वर तक्रार करा. (Digital Fraud)

गुन्ह्यांची मोडस ऑपरेंडी अपडेट केली: सायबर सेल

सायबर सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एटीएम फसवणुकीमुळे लोक सावध झाले. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी गुन्ह्याची पद्धत अपडेट केली. गेल्या काही वर्षांपासून डिजिटल वॉलेटबाबत शेकडो तक्रारी येत आहेत. हे ठग प्रथम वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक अॅप डाउनलोड करण्यास सांगतात. याद्वारे खाते लिंक करण्यापासून स्टेप बाय स्टेप पेमेंटची प्रक्रियाही पूर्ण करुन घेतात. मग हुशारीने तुमचा UPI आयडी पॅकेजचे कूपन म्हणून मोबाईलमध्ये सेव्ह करा म्हणतात आणि मग पैसे ट्रान्सफर करुन घेतात.

अधिक वाचा :

Back to top button