मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ११ ची घोषणा, नवे डिझाईन आणि नवा स्टार्ट मेन्यू  | पुढारी

मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ११ ची घोषणा, नवे डिझाईन आणि नवा स्टार्ट मेन्यू 

पुढारी ऑनलाईन डेस्क : मायक्रोसॉफ्टने गुरुवारी विंडोज ११ ची घोषणा केली असून वापरकर्त्यांना अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. विंडोजचे नवे व्हर्जन स्टार्ट मेन्यू, टास्कबार नव्या ॲप्सद्वारे काम करेल. गुरुवारी व्हर्च्युअल मीटिंगमध्ये ही घोषणा करण्यात आली. विंडोज ११ ही विंडोज १० ची अपग्रेड आवृत्ती असेल. विंडोज ११ नवीन इंटरफेस आणि अ‍ॅनिमेशन इफेक्टसह यूजरसमोर आली आहे.

वाचा : विनायक मेटेंच्‍या बैठकीत शिवसेनेचा राडा  

वाचा : वॉरेन बफेट यांचा गेट्स फाऊंडेशनच्या ट्रस्टी पदाचा राजीनामा, ३० हजार कोटींचे शेअर केले दान

मायक्रोसॉफ्ट वेबसाइटवर कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी पैनोस पानाय यांनी विंडोजच्या नव्या व्हर्जनची माहिती दिली. विंडोज ११ मध्ये नवा स्टार्ट मेन्यू आणि  सेंटर्ड टास्कबार नव्या युजर्ससाठी इंटरफेसचा भाग असेल. मायक्रोसॉफ्ट विंडोज ११ मल्टि टास्किंग वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी स्नॅप लेआऊटची सुविधा देण्यात आली आहे. विंडोजचे हे नवे जनरेशन अधिकाधिक टचफ्रेंडली असेल. विंडोज ११ मध्ये टिम्जद्वारे संवाद साधणे आता सहज शक्य असून थेट विंडोज ११ मध्ये सुरू करता येणार आहे. समोरचा यूजर कोणत्याही डिव्हाइसवर, अगदी मॅकवर असला तरीही तुम्ही कोणालाही व्हिडिओ कॉल करू शकाल. वापरकर्ता भिन्न डिव्हाइसवर, अगदी मॅकवर असला तरीही काही फरक पडणार नाही.

वाचा : मास्क काढणे भोवले; इस्राइलमध्ये पुन्हा महामारी 

वाचा : महिलांवरील लैंगिक अत्‍याचारास तोकडे कपडेच जबाबदार : इम्रान खान 

Back to top button