मुख्य न्यायमूर्ती वराळे शपथबद्ध | पुढारी

मुख्य न्यायमूर्ती वराळे शपथबद्ध

बंगळूर;  पुढारी वृत्तसेवा :   कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी भालचंद्र वराळे यांची नियुक्ती झाली असून शनिवारी त्यांनी पदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी वराळे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली.

11 ऑक्टोबर रोजी वराळे यांची मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी त्यांनी याआधी सेवा बजावली. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे वराळे यांचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठा पदवी विद्यापीठात त्यांनी कायदा पदवी मिळवली. ज्येष्ठ वकील एस. एन. लोहिया यांच्याकडे साहाय्यक म्हणून त्यांनी वकिली सुरु केली.

औरंगाबाद आंबेडकर कायदा महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर बॉम्बे हाय कोर्ट, औरंगाबाद खंडपीठामध्ये महाराष्ट्र सरकारचे वकील म्हणून काम पाहिले.याआधीचे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अभय एस. ओका यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाल्याने त्या जागी वराळी यांना नेमण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, सरकारच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा आदी उपस्थित होते.

Back to top button