रायगड : जेएनपीए बंदराजवळ 502 कोटीचे कोकेन जप्त | पुढारी

रायगड : जेएनपीए बंदराजवळ 502 कोटीचे कोकेन जप्त

उरण; पुढारी वृत्तसेवा :  जेएनपीए बंदराजवळील दिघोडे हद्दीतील एका गोदामामधून तब्बल 502 कोटी रुपयांचे 51.23 किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेतून हिरवे सफरचंद आणि पेर (पिअर्स) च्या बॉक्समध्ये कोकेनचा लगदा करून हे कोकेन लपविण्यात आले होते. महसूल गुप्तवार्ता संचालनालयला (डिआरआय) या बाबत माहिती मिळाली. त्यांनी गुरूवारी ता.6 रोजी
हा कंटेनर अडवून ठेवला होता. दिघोडे येथिल एमएफसी नावाच्या गोदामात एका रिफर कंटेनरमध्ये हा माल आला होता. जप्त केलेल्या कोकेनची आंतराष्ट्रीय बाजारात 502 कोटी रूपये किंमत आहे.

मागील आठवड्यातच डिआरआय आणि सिमाशुल्क विभागाने जेएनपीटी बंदराजवळून रक्त चंदन, हेरॉईन जप्त केल्याच्या घटना
घडल्या होत्या. एक आठवडाभरात पुन्हा एकदा 500 कोटी रुपयांचे कोकेन पकडल्याने जेएनपीए म्हणजे तस्करांचा अड्डा ठरू पाहत आहे. दरम्यान गुरुवारी पकडलेल्या कोकेन प्रकरणी एका आयातदाराला डीआरआयने अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटला प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेतून पेअर आणि नास्पती या फळांनी भरलेल्या कंटेनरची वाहतूक 6 ऑक्टोबर 2022 रोजी न्हावाशेवा इथं संशयावरून रोखण्यात आली. या कंटेनरची तपासणी केली असता त्यात खोक्यांमध्ये या फळांच्या आड प्रत्येकी सुमारे एक किलोग्रॅम वजनाच्या उच्च दर्जाच्या कोकेनपासून बनवलेल्या
विटा लपवलेल्या आढळून आल्या. या 50.23 किलोग्रॅम वजनाच्या 50 विटांची आंतरराष्ट ?ीय बाजारातली किंमत 502 कोटी रुपये असल्याचे तपासाअंती निदर्शनास आले.

दक्षिण आफ्रिकेतून याआधी आयात करण्यात आलेल्या संत्र्यांच्या आड लपवून आणलेला 198 किलो मेथ आणि नऊ किलोग्राम कोकेन
साठ्याच्या तस्करीप्रकरणी वाशी इथं महसूल गुप्तवार्ता संचालनालयान जप्त केलेल्या घटनेत अटक करण्यात आलेल्या आरोपीच्याच नावान ही अवैध तस्करीही होत असल्याचं आढळून आलं आहे. गेल्या काही दिवसात समुद्री मार्गाने कंटेनर मधून तस्करी करण्यात येत असलेला हा आणखी एक मोठा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एनडीपीएस कायदा 1985 नुसार या आरोपीला अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटकडून गेल्या दहा दिवसात 198 किलो मेथामफेटामाईन आणि नऊ किलो कोकेन ते 16 किलो हेरॉईन असे साठे जप्त करण्यात आले.

Back to top button