शुद्ध सोने दरात 716 रुपयांनी वाढ

शुद्ध सोने दरात 716 रुपयांनी वाढ
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  सराफ बाजारात सोन्याच्या दरात गुरुवारी मोठी वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजे ए) च्या वेबसाइटनुसार, आज सराफा बाजारात सोने 716 रुपयांनी महागले आणि त्याचा प्रति 10 ग्रॅम दर 51, 792 रुपये झाला.

सोन्याची कमतरता शक्य

गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकांच्या तिजोरीत 10 % पेक्षा कमी सोने शिल्लक आहे. मुंबईतील एका तिजोरीच्या अधिकार्‍याने सांगितले की, या तिजोरींमध्ये एरवी बँकांमधून अनेक टन सोने असते, परंतु सध्या ते फक्त काही किलो शिल्लक आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर जगातील दुसर्‍या क्रमांकाची सोन्याची मोठी बाजारपेठ असलेल्या भारतात सोन्याचा तुटवडा जाणवू शकतो. अशा परिस्थितीत, सर्वाधिक मागणी असलेल्या हंगामात खरेदीदारांना मोठा प्रीमियम भरून सोने खरेदी करावी लागू शकतो. त्यामुळे धनत्रयोदशी, दिवाळी आणि लग्नसोहळ्यासाठी सोने
खरेदी करणार्‍यांना जास्त किंमत मोजावी लागू शकते.

दरम्यान, देशातील 16 बँकांना सोने आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे . त्यात अ‍ॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, एचडीएफ, आर. बी. एल, एसबीआय, युनियन बँक आणि येस बँक यांचा
समावेश आहे.

दिवाळीत सोने महाग ?

केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, भारतीय घाऊक विक्रेते सोन्यासाठी प्रति औंस 1-2 डॉलरचा प्रीमियम भरतात. चीनमध्ये हा प्रीमियम 25 ते 30 डॉलर आणि तुर्कस्तानमध्ये 80 डॉलर आहे. यामुळेच बँकांनी भारताचे सोने या देशांमध्ये पाठवले आहे. सणांच्या काळात मागणी वाढल्यामुळे भारतातील घाऊक विक्रेते देखील 8 ते 10 पर्यंत प्रीमियम भरून सोने खरेदी करतील. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचा दर 10 ग्रॅम मागे 1000 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

कॅरेटनुसार सोन्याचे दर

कॅरेट       रु./10 ग्रॅम
24           51,792
23           51,585
22            47 , 442
18           38, 844

चांदीमध्ये किंचित घट?

चांदीत मात्र थोडीशी घसरण झाली. सराफा बाजारात ती 140 रुपयांनी स्वस्त होऊन तिचा भाव प्रति
किलो 60, 894 रुपये झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news