पुढारी ऑनलाइन डेस्क : कोरानाच्या सावटानंतर दोन वर्षांनी जवळपास सगळेच सण मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले. नवरात्रोत्सव आणि विजयादशमी-दसरा हा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन वर्षांनी गरबा दांडियाचे मंडळ सजले. गरबा म्हटले की गुजरातमधील होणारे गरबा महोत्सव देशात सर्वात सुंदर असतात. तसेच गुजरातच्या गरब्यासह त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील जिलेबी आणि फाफड्याची संस्कृती. यंदा अहमदाबादमध्ये दस-याच्या मुहूर्तावर तब्बल 150 कोटींचा जिलेबी-फाफड्याची विक्री झाली.
टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (GCCI) चे फूड कमिटीचे अध्यक्ष हिरेन गांधी म्हणाले, "यावर्षी मागणी चांगली होती आणि एकूण विक्री 30% वाढली आहे. फाफडा आणि जिलेबीचे उत्पादन 30% वाढले आहे. अहमदाबादमध्ये दसऱ्याच्या दिवशी फाफडा आणि जिलेबी विकणारी 1,500 छोटी-मोठी दुकाने आहेत."
या वेळी, उद्योग वर्गातून कॉर्पोरेट गिफ्ट बॉक्सेसची मागणी वाढलेली दिसली आहे. ज्यात फाफडा, जिलेबी आणि चटणीला जास्त मागणी आहे. "लोक गुणवत्ता आणि स्वच्छतेला प्राधान्य देतात आणि त्यामुळे कॉर्पोरेट गिफ्ट बॉक्सनाही जास्त मागणी आहे," असे गांधी म्हणाले.
एका दिवसात शहरात प्रत्येकी 8 लाख किलो फाफडा आणि जिलेबी विकल्या गेल्याचा उद्योगाचा अंदाज आहे. या वर्षी दोन्ही वस्तूंच्या किमती 20% किंवा त्याहून अधिक वाढल्या आहेत. फाफडा 700 ते 850 रुपये किलो आहे, तर जिलेबी 1000 ते 1300 रुपये किलो आहे.
शहरातील मिठाई आणि स्नॅक्स चेनचे मालक जय शर्मा म्हणाले, "यावेळी विक्री चांगली झाली आणि किमती वाढल्या असूनही आम्ही आरामात 25-30% वाढ पाहिली. आम्ही आदल्या रात्रीपासून तयारी सुरू केली. मिठाई आणि फरसाणच्या दुकानांनी आपला विस्तार वाढवण्यासाठी अहमदाबादमध्ये अनेक तात्पुरते स्टॉल्स लावले आहेत. आम्ही शहरभर अनेक स्टॉल्स लावले होते."
तर शहरातील मिठाईचे दुकान असलेले कमलेश कंडोई म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किंमती ५० रुपये प्रति किलोने वाढल्या आहेत, आणि तरीही मागणी आणि विक्री जास्त होती.
हे ही वाचा :