Jio 5G Service : 'या' चार शहरात आजपासून जिओची 5G सेवा सुरू, जाणून घ्या काय आहे वेलकम ऑफर! | पुढारी

Jio 5G Service : 'या' चार शहरात आजपासून जिओची 5G सेवा सुरू, जाणून घ्या काय आहे वेलकम ऑफर!

पुढारी ऑनलाइन डेस्क : Jio 5G Service दस-याच्या मुहूर्तावर रिलायन्स जिओने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी या चार शहरांमध्ये 5G सेवा आजपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार Jio 5G वेलकम ऑफर देखील जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही सेवा सध्या बीटा चाचण्या अंतर्गत जाहीर केल्या आहेत त्यामुळे प्रत्येकालाच लगेच 5G सेवा घेता येणार नाही.

Jio 5G Service रिलायन्सने या 4 शहरात 5G सेवा सुरू केली असली तरी कंपनीने आतापर्यंत कोणत्याही प्लॅनची घोषणा केलेली नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे 5G स्मार्टफोन आहेत त्यांना आपोआपोच जिओ 5G सेवेचा लाभ मिळू शकतो. दिल्ली मुंबई कोलकाता वाराणसी या 4 शहरांमध्ये राहणारे लोक आपोआप Jio 5G वेलकम ऑफरमध्ये अपग्रेड होतील. त्यामुळे, वापरकर्त्यांना वेलकम ऑफरमध्ये अपग्रेड करण्यासाठी कोणत्याही प्रक्रियेचा अवलंब करावा लागणार नाही.

Jio 5G Service कंपनीने जेव्हा 2017 मध्ये 4G सेवा लाँच केली तेव्हा तिने वेलकम ऑफरची घोषणा केली ज्या अंतर्गत अधिकृत योजना जाहीर होईपर्यंत वापरकर्ते 4G वर विनामूल्य प्रवेश मिळवू शकले. यावेळीही जिओ हीच रणनीती अवलंबण्याची शक्यता आहे.

Jio 5G Service काय आहे Jio 5G वेलकम ऑफर?

Jio 5G वेलकम ऑफर अंतर्गत, टेलिकॉम ऑपरेटर 1gbps+ पर्यंत स्पीडसह अमर्यादित 5G डेटा ऑफर करेल.
कंपनीने अद्याप कोणताही Jio 5G प्लॅन लॉन्च केलेला नाही. त्यामुळे सध्या तरी Jio 5G वेलकम ऑफर आत्तासाठी, मोफत आहे. किमान Jio 5G योजना जाहीर पात्र वापरकर्ते करेपर्यंत अमर्यादित Jio 5G मोफत मिळवू शकतील.

हे ही वाचा :

5G on Iphone – आयफोनवर ५G सुरू होणार का? एअरटेलचा मोठा खुलासा

दूरसंचार कंपन्या ‘या’ कालावधीत सुरु करणार 5G सेवा

 

Back to top button