Gujarat Accident : ट्रकने वडाप रिक्षाला दिलेल्या धडकेत १० ठार तर ७ जखमी | पुढारी

Gujarat Accident : ट्रकने वडाप रिक्षाला दिलेल्या धडकेत १० ठार तर ७ जखमी

वडोदरा; पुढारी ऑनलाईन : मालवाहतुक ट्रकने वडाप रिक्षाला देलेल्या धडकते १० जण जागीच ठार झाले तर ७ जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात गुजरात मधील वडोदरा शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दार्जीपुरा नजीक मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान (दि.४) घडला. मालवाहतुक ट्रक हा सुरत वरुन अहमदाबादकडे जात होता. (Gujarat Accident)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या दिशने भरधाव वेगात येणाऱ्या कारला चुकविण्याच्या नादात ट्रक चालकाकडून हा अपघात घडला. यावेळी ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटला व ट्रकने तीन चाकी प्रवाशी रिक्षाला जोरदार धडक दिली. अपघाताच्या काहीक्षणात अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत बजावकार्य सुरु केले. (Gujarat Accident)

रिक्षाचा चक्काचूर

आपल्या दिशेला येणाऱ्या वाहनाला चुकवताना ट्रक चालकाचा ताबा सुटला व त्याने विरुद्ध दिशेच्या मार्गावर वाहन घातले आणि समोरुन येणाऱ्या रिक्षाला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये रिक्षाचा पूर्ण चक्काचूर झाला होता. तर ट्रक रोडच्याकडेला असणाऱ्या खड्ड्यात गेला. (Gujarat Accident)

या अपघातातील मृत हे गोल्डन चौकडी येथे वडाप रिक्षात बसून कपुराई चौकाकडे जात होते. या भीषण अपघातानंतर महामार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. वाहतुक कोंडी सोडविण्याकरिता पोलिसांना तब्बल तासभराचा अवधी लागला. (Gujarat Accident)

पंतप्रधान मोदी यांच्या कडून मदत

या अपघाताची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीसुद्धा अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे.


अधिक वाचा :

Back to top button