राष्ट्रीय
पंतप्रधान मोदींनी दिल्लीत बसून युरोपात चालविली कार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत बसून युरोपमधील कार रिमोटच्या साहाय्याने चालविली. त्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्यासमोरील स्टेअरिंगने कार चालवत आहेत आणि कारच्या चाकांची हालचाल समोरील पडद्यावर दिसत असल्याचे या व्हिडीओतून बघायला मिळते.
दिल्लीतील इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये पंतप्रधान मोदी हे अॅरिक्सन कंपनीच्या बूथवर पोहोचले. येथून त्यांनी स्वीडनमध्ये 5-जी तंत्रज्ञानाच्या मदतीने अप्रत्यक्षपणे कार चालवली. युरोपमधील कारचे स्टेअरिंग कंट्रोल 5-जी तंत्रज्ञानाद्वारे दिल्लीला जोडण्यात आले होते.

