Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गे यांचा राज्यसभा विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा | पुढारी

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गे यांचा राज्यसभा विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : पाच दशकांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge )यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा आज (दि.१) राजीनामा दिला. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे. खर्गे यांच्या राजीनाम्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम अथवा दिग्विजय सिंह यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक खर्गे (Mallikarjun Kharge) लढवत आहेत. अशात पक्षाने नुकत्याच पारित केलेल्या ‘एक नेता एक पद’ प्रस्तावानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. शुक्रवारी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अध्यक्षपदाच्या शर्यतीत खर्गे आघाडीवर आहेत. जी-२३ गटातील पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी तसेच भूपिंदर हुड्डा यांनी अध्यक्षपदासाठी खर्गे यांच्‍या उमेदवारीला समर्थन दिले आहे.

‘एक नेता, एक पद’ या सुत्रानूसार काँग्रेस अध्यक्ष बनण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते; परंतु, गहलोत समर्थकांच्या बंडानंतर गांधी परिवाराचे विश्वासू , दलित नेते खर्गे यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आले. त्‍यांचे  नाव समोर येताच दिग्विजय सिंह यांनी माघार घेतली. १९ ऑक्टोबरला काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button