ज्या गर्भातून जन्म, तोच गर्भ देणार मातृत्वाचे सुख! | पुढारी

ज्या गर्भातून जन्म, तोच गर्भ देणार मातृत्वाचे सुख!

अहमदाबाद; वृत्तसंस्था : गुजरातमधील डॉक्टरांनी ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत एकाच दिवशी एकाच ऑपरेशन थिएटरमध्ये गर्भाशयांच्या दोन प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. त्यामुळे दोनजणी (वय 22 आणि 28) आता आई होऊ शकतील. दोन्ही लेकींना त्यांच्या मातांनीच गर्भाशय दान केले आहे.

ज्या गर्भाशयातून या दोन्ही जणींचा जन्म झाला, त्याच गर्भाशयातून त्यांना मातृत्वाचे सुख मिळेल, हे या शस्त्रक्रियांचे आगळे वैशिष्ट्यच! अहमदाबादेतील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसिज अँड रिसर्च सेंटरमध्ये (आयकेडीआरसी) या शस्त्रक्रिया पार पडल्या. एकाच दिवसात दोन गर्भाशय प्रत्यारोपणाचा विक्रमही ‘आयकेडीआरसी’च्या नावे नोंदला गेला.

Back to top button