Ankita Bhandari Murder Case : पुलकित आर्याचे ‘ते’ रिसॉर्ट जमावाने जाळले, आरोपींना कोर्टात नेताना जमावाकडून मारहाण | पुढारी

Ankita Bhandari Murder Case : पुलकित आर्याचे 'ते' रिसॉर्ट जमावाने जाळले, आरोपींना कोर्टात नेताना जमावाकडून मारहाण

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

पुढारी ऑनलाइन डेस्क : Ankita Bhandari Murder Case उत्तराखंडसह संपूर्ण देशात अंकिता भंडारी खूनामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक लोकांनी घटने विरोधात तीव्र निदर्शने करण्यात येत आहे. अंकिता भंडारी पुलकित आर्याच्या ज्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब करत होती त्या रिसॉर्टला जमावाने आग लावली आहे. तसेच पुलकितसह अन्य आरोपींना कोर्टात नेत अताना जमावाने पोलिसांची गाडी रोखून आरोपींना चोप दिला आहे.

Ankita Bhandari Murder Case Uttarakhand : बेपत्ता रिसेप्शनिस्ट अंकिताचा मृतदेह सापडला, खून प्रकरणी भाजप नेत्याच्या मुलाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Ankita Bhandari Murder Case अंकिता भंडारी ही उत्तराखंडच्या पौड़ी गढ़वाल के नांदलस्यूं पट्टी च्या श्रीकोट येथी रहिवासी होती. तिच्या घरची परिस्थिती चांगली नसल्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी तिने नोकरी करायचे ठरवले. तिच्या एका मित्राच्या मदतीने तिला पुलकित आर्याच्या वनांतर रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्टचा जॉब मिळाला. पुलकित आर्या हा भाजप नेता आणि पूर्व राज्यमंत्री विनोद आर्या याचा मुलगा आहे.

पुलकितने अंकिताला रिसॉर्टमध्ये येणा-या ग्राहकांसोबत संबंध ठेवायला सांगितले. मात्र तिने नकार दिला. तसेच ती पुलकितला याबाबत आपण सर्वांना सांगून रिसॉर्टचे सत्य बाहेर आणेल, अशी धमकी देत होती. यातून पुढे वाद होऊन पुलकित आणि त्याच्या दोन व्यवस्थापकांनी अंकिताला चीला बैरोजजवळ आणले तिथे त्यांच्यात भांडणे होऊन त्यांनी तिला कॅनॉलमध्ये ढकलून दिले. अंकिताने बचावासाठी मदत मागितली पण आर्या आणि त्याचे व्यवस्थापक मित्र पळून आले. त्यानंतर त्यांनीच राजस पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली.

दरम्यान, पोलीस तपासात तब्बल 5 दिवसांनी या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी पुलकित आणि त्याच्या मित्रांना अटक केली. ही बातमी परिसरात वा-याच्या वेगाने पसरली. परिणामी परिसरातील स्थानिक लोक आक्रमक झाले. त्यांनी तीव्र निदर्शने केली. संतप्त जमावाने आज पुलकित आर्याच्या रिसॉर्टला आग लावली. तसेच आरोपींना आज कोर्टात नेत असताना संतप्त जमावाने पोलिसांची गाडी जवळपास अर्धातास रोखून धरली. जमावाने आरोपींना चांगलाच चोप दिला. अखेर पोलिसांना जमावावर लाठीमार करून त्यांना दूर करावे लागले.

अंकिता भंडारी हत्येप्रकरणी स्थानिकांनी भाजप आमदार रेणू बिष्ट यांचा देखिल निषेध केला आणि त्यांच्या कारची तोडफोड केली. आमदाराला पोलिसांना सुरक्षित रित्या  न्यावे लागले. घटनेचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर देखिल उमटले आहेत. काहींनी भाजपच्या नावे पोस्टर टाकले आहे. त्यात म्हटले आहे. अंकिता भंडारी हत्याकांडात भाजप नेत्याचा मुलगा मुख्य आरोपी आहे आणि दुसरीकडे भाजप बेटी बचाव म्हणत आहे. अशा प्रकारच्या पोस्ट टाकून भाजपला ट्रोल केले जात आहे.

विनोद आर्या आणि अंकित आर्याची भाजपमधून हकालपट्टी

दरम्यान, घटनेला भाजपच्या नेतृत्वाने गांभीर्याने घेतले आहे. भाजपने मुख्य आरोपी पुलकित आर्याचे वडील आणि पूर्व राज्यमंत्री भाजप नेते विनोद आर्या आणि पुलकितचा भाऊ अंकित यांची पक्षातून तात्काळ प्रभावातून हकालपट्टी केली आहे.

हे ही वाचा :

Bipasha Basu Baby Shower : बिपाशा बेबी शॉवर पार्टीत म्हणाली, मला दोन मुलं…

Back to top button