चित्त्यांच्या शिकारीसाठी चितळ आणि हरिण सोडल्‍याच्‍या निषेधार्थ बिश्नोई समाजाचे धरणे आंदोलन | पुढारी

चित्त्यांच्या शिकारीसाठी चितळ आणि हरिण सोडल्‍याच्‍या निषेधार्थ बिश्नोई समाजाचे धरणे आंदोलन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आफ्रिकेतील नामिबियातून भारतात आणण्‍यात आलेल्‍या चित्त्‍यांना मध्‍य प्रदेशमधील कूनो राष्‍ट्रीय उद्‍यानात ठेवण्‍यात आले आहे. चित्त्‍यांना शिकार करता यावी यासाठी कूनो राष्‍ट्रीय उद्‍यानात चितळ आणि हरिण सोडण्‍यात आले आहेत. या निषेधार्थ बिश्नोई समाजाने हरियाणातील फतेहाबाद जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे.

आठ चित्त्‍यांना शिकार मिळावी म्‍हणून राजगढ जगंलातून १८१ चितळ आणि हरिण सोडण्‍यात आले आहेत. यावर अखिल भारतीय बिश्नोई महासभेचे अध्‍यक्ष देवेंद्र बूडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

देशात तब्‍बल ७० वर्षांनंतर चित्ते आणले आहेत. भारतात १९५२ रोजी चित्त्‍याचे अस्‍तित्‍व संपुष्‍टात आल्‍याचे जाहीर करण्‍यात आले हाेते. यापूर्वी १९५२ मध्‍ये चित्ते भारतात नामशेष झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते.

हेही वाचा : 

 

Back to top button