पुढारी ऑनलाईन डेस्क : तैवानमध्ये भूकंपानंतर भारतातील ईशान्येकडील राज्यांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अरुणाचल प्रदेशातील दिबांग खोऱ्यात रविवारी (दि. १८) सायंकाळी ६.२७ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.4 नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किमी खोलीवर होता.
तैवान, जपान आणि चीन या देशांना शनिवारपासून भूकंपाच्या सलग धक्क्यांनी हादरले आहेत. शनिवारपासून आजपर्यंत या तिन्ही देशांना सुमारे ५० हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.