मनोज वाजपेयीने घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट, सोशल मीडियावर रंगली चर्चा | पुढारी

मनोज वाजपेयीने घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट, सोशल मीडियावर रंगली चर्चा

पुढारी ऑनलाइन डेस्क : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांनी शनिवारी बिहारची राजधानी पाटणा येथे राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही या बैठकीचे फोटो शेअर केले आहेत.

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, आज एअर ॲम्ब्युलन्सनं दिल्‍लीला हलविणार

तेजस्वी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, बिहारच्या मातीचे लाल, हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि गंभीर अभिनेते पद्मश्री मनोज बाजपेयी आम्हाला आमच्या निवासस्थानी भेटायला आले आणि माझे वडील लालू यादव यांच्या आरोग्याची विचारपूस केली. आपल्या मेहनतीमुळे आणि कर्तृत्वामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत ओळख बनवून बिहारचा गौरव केला आहे. एका चित्रात, राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते RJD प्रमुख आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांना हात जोडून अभिवादन करताना दिसतात. इतर चित्रांमध्ये, बाजपेयी पिता-पुत्र जोडीसोबत गप्पा मारताना दिसत आहेत.

मनोज बाजपेयी हे मूळचे बिहारचे आहेत

बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया शहराजवळील बेलवा या छोट्या गावात जन्मलेल्या बाजपेयींना लहानपणापासूनच अभिनेता बनण्याची इच्छा होती. मनोज बाजपेयी यांचे सुरुवातीचे शिक्षण बेलवा गावातच झाले. इयत्ता पाचवीनंतर त्याला जिल्हा मुख्यालय बेतिया येथील केआर स्कूलमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले. येथून त्यांनी मॅट्रिक (दहावी) परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्याने एमजेके कॉलेज, बेतिया येथून इंटरमिजिएटचे शिक्षण पूर्ण केले. इंटरमिजिएटनंतर मनोजने दिल्लीच्या रामजस कॉलेजमधून १९८९ मध्ये इतिहास (प्रेस्टीज) मध्ये पदवी घेतली. या काळात अभिनयाची जोड होती. वयाच्या सतराव्या वर्षी ते दिल्लीला गेले आणि त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी अर्ज केला आणि चार वेळा तो नाकारला गेला. मात्र मेहनतीनंतर त्याला प्रवेश मिळाला.

भेटीनंतर सोशल मीडियावर रंगली चर्चा

दरम्यान, मनोज बाजपेयी यांनी लालू यादव यांची भेट घेतल्याचे तेजस्वी यादव यांचे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटवर ढीगभर लाइक्स, कमेंट्स पडत आहे. तसेच मनोज बाजपेयी राजदमध्ये जाणार का? किंवा मनोज बाजपेयीला राजद सोबत राजकीय कारकीर्द सुरू करायची आहे का? या चर्चांना उधाण आले आहे.

हे ही वाचा :

HBD Shabana Azmi : कधी काळी कॉफी विकून ३० रु. कमवायच्या शबाना आझमी

कालचाच खेळ आज पुन्हा….

Back to top button