EMI : वसुली दिली नाही म्हणून शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडले; गर्भवतीचा दुर्दैवी अंत 

EMI : वसुली दिली नाही म्हणून शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडले; गर्भवतीचा दुर्दैवी अंत 

पुढारी ऑनलाईन डेस्क :  फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वसुली दिली (EMI) नाही म्हणून शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडले. यात त्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही धक्कादायक घटना झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात घडली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

EMI : दिव्यांग शेतकऱ्याची पोर 

माहितीनुसार,  झारखंड राज्यातील हजारीबाग जिल्ह्यात एका फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याने एका गर्भवती महिलेला ट्रॅक्टर खाली चिरडले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी इचक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मयत महिला एका दिव्यांग शेतकऱ्याची मुलगी असून ती तीन महिन्यांची गर्भवती होती.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज रतन चोथे यांनी सांगितले की, ट्रॅक्टर वसुलीसाठी शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्यावर फायनान्स कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात बाचाबाची झाली. वादानंतर त्या शेतकऱ्याच्या गर्भवती मुलीवर ट्रॅक्टर अंगावर घालण्यात आला. या घटनेमुळे इचक ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण झाले आहे. हजारीबाग शहरातील फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला मोठ्या संख्येने घेराव घालून आरोपींना अटक करण्याची मागणी करत मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

EMI : 3 महिन्यांची गर्भवती

डीएसपी म्हणाले, "वसुली आधिकारी आणि खाजगी फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकासह चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, महिंद्रा फायनान्स कंपनीचे अधिकारी त्यांना न सांगता त्यांच्या घरी आले. तो म्हणाला, 'ती ट्रॅक्टरसमोर आली आणि वाद झाला असता त्यांनी तिला चिरडले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. हजारीबागच्या स्थानिक पोलिसांनीही ट्रॅक्टर जप्त करण्यासाठी पीडितेच्या घरी जाण्यापूर्वी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती दिली नव्हती, अशी माहितीही दिली.

एक मानवी शोकांतिका

महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शाह म्हणाले की, कंपनी सर्व बाबी तपासेल. शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही हजारीबागच्या घटनेमुळे अत्यंत दु:खी  झालो आहोत. एक मानवी शोकांतिका घडली आहे. थर्ड पार्टी एजन्सी वापरण्याच्या घटनेची आम्ही चौकशी करू. या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news