#RSS_मुख्यालय_घेराव हा ट्विटरवर सुरू असलेला ट्रेंड नेमका आहे तरी काय? | पुढारी

#RSS_मुख्यालय_घेराव हा ट्विटरवर सुरू असलेला ट्रेंड नेमका आहे तरी काय?

पुढारी ऑनलाईन : सध्या ट्विटरवर ‘#RSS_मुख्यालय_घेराव’ हा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडशी संबंधित 47.7K Tweets पडले आहेत. हे पाहून तुम्हाला प्रश्न पडू शकतो की, नेमका काय आहे हा ट्रेंड. चला तर जाणून घेऊया या ट्रेंडविषयी…

भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि सर्व संलग्न संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशाल महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरमधील बेजन बाग, कामठी रोड येथे या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आपल्या ट्विटरवरून सांगितले आहे. हा मोर्चा नापूरमधील RSS च्या मुख्यालयाला घेराव घालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मोर्चाला ट्विटरवर प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे ‘#RSS_मुख्यालय_घेराव’ हा ट्रेंड सुरू झाला आहे.

हा मोर्चा गुरूवारी 6 ऑक्टोबरला 2022 आयोजित करण्यात आला असून, याचे उद्घाटन अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती वीरेंद्र यादव यांच्या हस्ते होणार असल्याचेही भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी ट्विट करत सांगितले आहे.

Back to top button