जम्मू-काश्मीर : पूंछमध्ये बस दरीत कोसळून ११ जणांचा मृत्यू | पुढारी

जम्मू-काश्मीर : पूंछमध्ये बस दरीत कोसळून ११ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीरच्या पूंछमधील सावजियान भागात मिनी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे २५ जण जखमी झाले आहेत. लष्कराच्या जवानांचे बचावकार्य सुरू असून जखमींना मंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुंछ जिल्ह्यातील मंडी तहसीलमधील भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ गली मैदानातून पूंछकडे जाणारी मिनी बस सावजियांच्या सीमावर्ती भागात दरीत कोसळली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे 25 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच लष्कर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना मंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिनी बसमध्ये 36 जण होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी लष्कर, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांची संयुक्त बचाव मोहीम सुरू असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button